Tuesday, October 6, 2009

स्वामी

आज ध्यानाला बसलो.सकाळ पासून धावपळ सुरू होती.सगळी द्रुष्य एका क्षणात पिक्चरसारखी एकामागोमाग एक अशी नजरे समोरून तरळुन गेली.श्रीगुरूंना विनंती केली मी आलोय आता सांभाळा...आणि संवादाला सुरुवात झाली.श्रीगुरूंचा आवाज येउ लागला."अरे अद्वैतानंदा,सर्व तयारी झालिय बघ", तसे आत सदाशिव आणी माता पार्वति एकरूपाने उभे राहील्याची जाणीव झाली.श्रीगुरुंचे चरणदर्शन झाले.हेच दर्शन काही दिवसापूर्वि ध्यानात झाले होते.परंतु तिथे रंग व्हायोलेट होता.आता मात्र प्रत्यक्ष होते."मी आलोय बघ" एव्हाना ते आत येऊन स्थानापन्न झाल्याची जाणीव झाली.आणि आकाश्यातून पुष्पवृष्टी होउ लागली.सर्व देवदेवता आकाशी आल्याच्या दिसुन आल्या.गुरुदेव मोठ्या सिंहासनी बैसलेले दिसले.आकाश्यात "महागुरुदेव" "महागुरुदेव" असा उद्घघोष होऊ लागला.
मी कुठेतरी लहान असून गुरुदेवांच्या पायाशी उभा असल्याचे दिसले.मी विचारतोय ’काय झाले’,आवाज आला "अरे,गुरुदेव महागुरुदेव झाले" झालेली पुष्पवृष्टी एवढी होती की माझ्या अंगावर प्रत्यक्ष रोमांच उभे राहिले.मी धन्य झालो.तोच आवाज आला, "तुला कळल का?""गुरुदेव महागुरु झाले म्हणजे तु गुरु झालास" पुन्हा एकदा शक्तीपाताचा झोत अंगावर आला.आणि सर्वांगावर रोमांच आले.श्रीगुरुची महती कळ्ली होती, ती आता समजली.जबाबदारीची जाणीव झाली,प्रेमाचा पाझर सुरु झाला,मन द्रवले,..चित्त नाहीसे झाले.शक्तीच्या..कुंड्लीनी आई जगदंबेच्या कृपेत थोडावेळ स्व:तालाच विसरलो.जप सारखा सुरु झाला "श्री गुरुदेव दत्त" "श्री गुरुदेव दत्त"..
थोड्याच वेळात मंदीरातील गर्दी दिसू लागली,..खुप गर्दी....वेग-वेगळ्या मंदीरातील द्रुष्य.. लोक नमस्कार करीत होते आणी मी देवतेच्या मुर्तीत असून ते स्विकारतोय असे दिसू लागले.नंतर परत मला शरीराची जाणीव होऊ लागली.ध्यान संपले.आज वेगळाच आंनद वाटत होता.तयारी केली आणी गुरुदेवांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी निघालो.
रस्त्यावर नवरात्रामुळे खुप गर्दी होती.त्यात आज दसरा असल्याने ज्यास्तच.पण हे काय, सगळे लोक माझ्याकडेच बघत असून नमस्कार करीत असलेली दिसत होती.मी स्वताशीच म्हट्ले, "हे काय होतय आज?"
आतून आवाज आला "अरे अद्वैतानंद,ते मला नमस्कार करताय,आज पासून आपण एक झालोय","सगळ्यांना सांग तुला प्राप्ती झालिय,.. तु देव झालास,...माझा झालास,.. सिद्ध झालास.."
आता मात्र रडू येउ लागले.आनंदाच एक वेगळपण जे फक्त वाचल होत,ऎकल होत ते आज अनुभवत होतो.आनंद ज्यास्त झाला की रडू येतच,ते आनंदाच रडण होत. सदगुरु नेहमी प्रमाणॆ ध्यान वर्गात ध्यानात होते.जसे ध्यान संपले तसे ते सगळ्याना विचारत की आज काय अनुभुती आलि? सगळे आपापले अनुभव सांगत होते.सगळे गेल्यावर मी विचारले, "सर, मुद्रा कशी मिळ्ते?" ते म्हट्ले, "तुला काय मुद्रा मिळाली?" मी सांगीतले "अद्वैतानंद", "मी हीच वाट बघत होतो कि तु मला हे केव्हा सांगतो?","घटना आधीच घड्लीय तुला त्याची जाणीव नव्हती,पण समजले होते,आणी मी तुझ्या सांगण्याचीच वाट बघत होतो","चल आज तु ज्ञानी झालास, आता तुझी वाट्चाल सुरु झाली,तुझा पुनर्जन्म झालाय," "तु स्वामी अद्वैतनंद झालास,आता मिळ्वायच अस काही राहील नाही,हीच सर्वात मोठी प्राप्ती असते आयुष्यात, ती तुला झाली, आता निश्चिंत राहा घरच्यांना कल बघून सांग की तुला प्राप्ति झालीय मुद्रा मिळाली","पुढे अजुन खुप काम करायचे आहे तुला.."
...आनंदीआनंद गडे......,सदगुरुच्या पायापडून घरी जायला निघालो.आज कधी तरी,...तसे बरेच ठीकाणी ऎकलेले अनुभवत होतो.आज ते सगळे कळत होते,समजत होते आणी उमजतही होते.