Wednesday, May 31, 2017

आनंदाचे डोही संसाराचे तरंग ????

संसाराची पण एक गंम्मत असते. अध्यात्मिकता हा मनात रुजलेला, त्याचा भाव असतो.पण दाखवता येत नाही. खुपच पंचाइत आहे बुवा.वरवरुन पहाता नाट्कात काम केल्याचा आनंद.....
   वरुन समाजकारण व आतुन कुरण चरणारे बैल/ सांड त्यांचे भांड आपण रोजच्या व्यवहारात नेहमी पहातो.
ईथे नेमके याउलट होते.वरुन समाज कारण आणी आतून आध्यात्मिक असा हा मायाबाजार... धन्य ते मायापति आणि त्याची (योग)माया.
गुरुशक्ती अनंत रुपाने काम करते. इथे ती मायेच्या रुपाने कार्यासन्न असते.नेहमी येणारयाला दिसते ते वरवरचे समाजसेवेचे रुप, पण आतुन जे आध्यात्मिक प्रसादाचे काम सुरु असते ते एखाद्यालाच दिसते.
 आपण हंसासारखे रहावे, पाणी काढुन टाकावे व क्षिर तेवढे घ्यावे....















(ता.क. वरील वर्णन खरया भक्तांच्या संसाराचे आहे.भागवतांनी/वाचकानी समजुन घ्यावे.)

आपला स्नेहाभिलाषि.....