Wednesday, December 23, 2009

ध्यानाचे तारांगण भाग:२

ध्यान काय आहे? ध्यान म्हणजे काय?.....
"लक्ष कुठे आहे? मी काय सांगतोय तिकडे ध्यान दे आणि लक्ष्यात ठेव"
आता हे अस बोलण आपण सहज ऎकतो व बोलतो सुध्दा.यात सहजता असल्याने जे सहज तेच बोलले जाते.अर्थ लावताना बरोबरच लावला जातो. पण जेव्हा फ़क्त ध्यान हे शब्द आपण ऎकतो, तेव्हा गोंधळ उडतो. का? कारण कार्य कारण भाव प्रकट अर्थाने प्रगट झालेला नसतो.जरा सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा कोणी तरी "इकडे लक्ष दे" अस म्हणते,तेव्हा ते वाक्य म्हणणारी व्यक्ती काहीतरी सांगणार/करणार हे गृहीत धरुन आपण आपले लक्ष/ध्यान तिकडे केद्रित करतो किंवा देतो.इथे क्रिया घडणार हे गृहीत व प्रकट स्वरुपात असते. हेच जेव्हा अप्रगट स्वरुपात असते, तेव्हा मात्र आमचा गोंधळ होतो.व नेमके काय करायचे ते लक्ष्यात येत नाही? व सोप्पी गोष्ट कठीण हॊउन जाते.
आता आपल्या लक्ष्यात आले असेल कि नेमके काय होते आहे? नाही... ठीक आहे.अजून समजून घेऊ.
आपण लक्ष्य देतो म्हणजे काय करतो? तर आपल्या जाणीवा ग्रहणशील करून तिव्र करतो.म्हणजे समोरचा(विनंती करणारा)काहीतरी करेल/सांगेल ते ग्रहण करण्यास,बघण्यास किंवा ऎकण्यास तयार होतो किंवा उत्कंठीत होतो.हीच ध्यानाची तयारी.आता याला काही आसनाची गरज नाही,विशिष्ट पोज किंवा स्थितीची आवश्यकता नाही.नंतर घडते ते ध्यान.म्हणजे लक्ष्यपुर्वक ऎकणे/बघणे किंवा काही घड्ण्याची वाट बघणे, होईल ते पहाणे,ऎकणे.इथे आपण फक्त बघतो/ऎकतो म्हणजे घडणारया घट्नेचे साक्षिदार किंवा साक्षी असतो.हाच साक्षीभाव.आणि महत्वाचे म्हणजे घट्ना घडून पुर्ण होई पर्यत वाट बघतो व साक्षी भावात साक्षीदार असतो. हीच साधना.घटनेच्या पुर्णतेची जाणीव होई पर्यत साक्षीदार/साक्षीभावात असणे व न कंटाळता बघत असणे हेच साधनेचे तप.
अजुन उदाहरणाने हीच गोष्ट समजून घेउ....पण पुढच्या भागात.
भवतु: शुभम: मंगलम।
इति अद्वैतानंद उवाच।

No comments:

Post a Comment