Monday, December 21, 2009

ध्यानाचे तारांगण भाग:१

"पोराच ध्यान काही ठिकाणावर नाही, बर का?" या लहानपणी शेजारयाने आई जवळ केलेल्या चुगलयापासून तर "कुठे ध्यान लागलय आज?" या ऒफ़ीस सहकारयाच्या शेरयापर्यंत प्रत्येकाचा ध्यानाशी संबंध असतो.एवढा हा रोजच्या गोष्टीशी संबधीत विषय, एखाद्या भगव्या रंगाचे कपडे घातलेल्या माणसाने सांगीतला की गंभीर होउन जातो. का? तर त्याला आध्यात्मिक जोड मिळते व चेहरा आपोआप गंभीर होतो."काहीतरी नक्कीच विषेश आहे बर का !,ते मोठे योगीपुरुष आहेत.त्यांनी एवढेतेव्हडे वर्ष हिमालयात घालवलीत बर का, आणी मग त्यांना अलानीफ़लानी सिद्धी प्राप्त झालीय","आता ते मोठे समाज कार्य करीत आहे""योगावर,ध्यानावर व्याख्यान देतात" "वर्ग घेउन शिकवीतात,अगदी कोर्सवेअरपण देतात,सी.डी.आणी काही पुस्तक,हो त्यांनीच लिहलीय,खुपच मोठे महापुरुष आहेत हो" चर्चा एथेच थांबत नाही, तर "तो आमचा मावस-चावट़़़़़ नात्यातला आहेना तो त्याच्या कार्यात खुप आहे हो.अगदी संसारसोडून तेच फ़ूलटाईम करतोय."
आता ही चर्च्याएकून काय वाटेल,कोणी ध्यान करायला जाईल? निदान माझ्यासारखा अतीसामान्य माणूस तरी नाही.कारण? भीती...घर,संसारसोडून बापरे! नको नको ते नकोच.
आज विचारप्रदूषण ऎवढे आहे कि अगदी रोजच्या जिवनाविषयी माणूस शुध्दविचार करू शकत नाहीय.शुध्दविचार करण्याची पात्रता गमावून बसल्याने,विवेक [जो की जिथून आतला (आत्म्याचा) आवाज येईल असे]गमावून बसलाय.आता गंम्मत अशी कि पुर्वजांनी लिहीलेले द्न्यान हे संस्क्रुतात लिहले.ही भाषा सामान्यांना न कळ्णारी.त्यात ती अलंकारीक,त्यांमुळे समजण्यास कठीण.मग भाषांतर कसे होणार?समजा झाले तर शुध्द कितपत? इथून पुढे सुरु होते ती एक शोकांतिका.भरकट्लेली शब्दांकने,शब्दार्थाने नटलेले फ़सवे लेख व ’न’ करणारयाची नकार घंटा.
धन्यवाद आमच्या पुर्वजाना, त्यानी ञान अबाधीत राखाण्यासाठी एक राज मार्ग अजून राखुन ठेवलेला होता,तो म्हणजे गुरुपंरपरा.
काहीसा कुतुहलचा, गुप्त(सहज न समजणारा), बराच बदनाम व खुपच प्रसिध्द असा.शुध्द ञान हे कोणीच कोणाला देवू शकत नाही, कारण ते अपौरुषेय(स्वयंभु) आहे.पण ते मिळण्याची व्यवस्था होवू शकते.वेळ आली कि कोणीतरी येतं आणि गुरुपर्यंत घेवून जात.पुढे पुढे गुरुअभ्यास पुर्ण झाला कि ते आपोआप प्रकट होवु लागत.आता "ज्याची जशी आवश्यकता आहे त्याचा तसा पुरवठा" हे ब्रम्हवाक्य(अबाधीत) असल्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो.
हे कस होत? केव्हा होत? सुरुवात कशी करायची? कुठुन करायची?अजुन काही लागेल काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढील शब्दप्रवासात मिळ्तीलच.फ़क्त सबुर आणी श्रध्देची आवश्यकता आहे.ती असली म्हणजे सुरुवात होइलच,नसली तरी निरशेचे कारण नाही.फ़क्त करण्याचे कष्ट घ्या.इच्छापुर्ण होइलच.कारण प्रत्येक कर्माला फ़ळ असतेच.क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच.
भवतु शुभम: भक्ताना: .....सर्वाना:
इति: सदगुरुचरणरज अद्वैतानंद.

No comments:

Post a Comment